पाचोरा, – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से.हायस्कूलमध्ये महाराष्ट्राचे शिल्पकार, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमास मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील, ए. बी. अहिरे, डी. डी. विसपुते, सुबोध कांतायन, कार्यालय प्रमुख अजय सिनकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी व टेक्निकल विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, विजय पाटील, संजय पाटील, ईश्वर पाटील, विजय महाजन तसेच ज्येष्ठ शिक्षिका, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.