पाचोरा येथील कृष्णापुरी व पांचाळेश्वर पुलांच्या कामास सुरुवात

 

पाचोरा, प्रतिनिधी  । पाचोरा शहरातून वाहत जाणाऱ्या कृष्णापुरी भागातील हिवरा नदीवरील पुलाच्या व पांचाळेश्वर या दोन पुलांच्या कामास आज सुरुवात करण्यात  आली

 

शहराला जोडणाऱ्या या दोन्ही पुलाच्या बांधकामामुळे वाहन धारकांसह सर्वसामान्य नागरिकांना व स्थानिक  लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

पालिकेने यापूर्वीच जाहीर सूचना प्रसिद्ध करत यामार्गावरील  रहदारी बंद केली आहे. बांधकाम व्यावसायिक एम. एस. पी. बिल्डकाँन या कंपनीने या कामाचे कंत्राट घेतले असून कामाच्या माध्यमातून पाचोरा पालिकेत सत्ताधारी शिवसेनेने देखील वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेल्या पावलाचे  कौतुक होतांना दिसत आहे.

 

कृष्णापुरी पुलाची  चार फूट उंची वाढवली जाणार असून पाचोरा नगरपालिकेने आमदार किशोर पाटील यांचे माध्यमातून सतत पाठपुरावा करत यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे पंचाळेश्वर या तुलनेने मोठ्या असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या कामांच्या पुर्ततेची मुदत वर्षभराची आहे मात्र निसर्गाने साथ दिल्यास कृष्णापुरी पुलाचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचे आपले उद्दिष्ट ठेवल्याचे कंत्राटदार मनोज पाटील यांनी सांगितले

 

. दरम्यान तिसरा ७ कोटी रुपयांचा पूल अर्थात स्मशानभूमीला जोडणाऱ्या पुलाचेदेखील काम आगामी महिन्याभरात सुरू करण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली  या तीनही पुलांच्या बांधकामामुळे दळणवळण जलद होण्यास मदत मिळून नागरिकांना वर्षानुवर्षे होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या  वचनपूर्तीचा आनंद होत असल्याची भावना नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी व्यक्त केली आहे.

 

पाचोरा व भडगाव शहरात विविध विकास कामे मंजुरीच्या टप्यात असून पाचोरा शहरातील गाव भागातील रस्ते कामांच्या ४४ कोटी रुपयांच्या डी.पी.आर. ला तत्वतः मंजुरी मिळाली आहे. लवकरच या कामांना सुरुवात असून वचनपूर्तीचा शिवसेनेला आनंद आहे असे आमदार  किशोर पाटील यांनी सांगितले

 

Protected Content