पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा – भडगांव या सेवाभावी, ग्राहक हितासाठी कार्य करणाऱ्या संस्थेची वार्षिक बैठक ८ जानेवारी रोजी शिला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत संघाच्या अध्यक्षपदी ॲड. मनिषा पवार यांची निवड करण्यात आली आहे.
याबैठकीत रेल्वे प्रश्नांबाबत आणि पाचोरा येथील रेल्वे समस्येबाबत कार्याध्यक्ष आर. पी. बागुल यांनी महत्वपूर्ण माहिती सांगितली. पाचोरा-जामनेर ब्रॉडगेज व्हावे, पाचोरा येथे विदर्भ एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, पंजाब मेल, आझाद हिंद एक्सप्रेस, गितांजली एक्सप्रेस या गाडयांना थांबा मिळावा. यापूर्वीचे रेल्वे टाईम टेबल पाचोरा येथील ग्राहकांना फायद्याचे होते. आताचे रेल्वे गाड्यांचे टाईम टेबल पाचोरा येथील प्रवासी ग्राहकांना गैरसोयीचे आहे. ते पूर्वीसारखे करावे असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले. प्राचार्य डी. एफ. पाटील यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जनरल मॅनेजर सेंट्रल रेल्वे मुंबई यांना २० जानेवारी २०२२ रोजी निवेदन पाठविले होते. त्यात भुसावळ ते मुंबईसाठी एक एक्सप्रेस गाडी सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गोरगरीब जनतेसाठी ग्राहक सेवा संघाने प्रयत्न करुन उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले आहे. तरी या रुग्णालयाचे बांधकाम त्वरीत सुरु करण्यात यावे. अन्यथा ग्राहक सेवा संघातर्फे जनतेचा प्रचंड मोर्चा काढण्यात येईल हा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यानंतर अध्यक्षा शिला पाटील यांनी वर्ष २०२३ करीता अॅड. मनिषा पवार यांची ग्राहक सेवा संघाच्या अध्यक्षपदाची घोषणा केली. नुतन अध्यक्षा अॅड. मनिषा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार आनंद नवगिरे यांनी मानले. बैठकीचे सूत्रसंचलन उज्वला महाजन यांनी केले. बैठकीस विनोदराय मोदी, राजेंद्र प्रजापत, गोपाल पटवारी, एकनाथ सदनशिव, अशोक महाजन, कैलास अहिरे, अशोक मोरे, रविंद्र सोनवणे, राधेशाम दायमा, राकेश सावंत, अनिता दायमा, लता शर्मा, माला पंजाबी, नीना राजपूत, डॉ.भरतकुमार प्रजापत, राधा शर्मा, क्षमा शर्मा, कमल महाजन, दुर्गा शर्मा, ज्योती चौधरी, सरला पाटील आदि उपस्थित होते.