पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा ते परधाडे रेल्वे लाईनवरील रेल्वे गेट क्रं. १३४ एस. पी. एल. हे दि. ६ एप्रिल २०२३ ते दि. ८ एप्रिल २०२३ पर्यंत सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम, रेल्वे रुळ बदलविणे या कामांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
या मार्गावरुन वापरणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पाचोरा रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनिअर यांनी केले आहे. याबाबतची माहिती पोलिस स्टेशन (पाचोरा), ग्रामीण रुग्णालय (पाचोरा), ग्रामपंचायत (परधाडे), नगरपालिका (पाचोरा), रेल्वे स्टेशन प्रबंधक (परधाडे), रेल्वे स्टेशन प्रबंधक (पाचोरा), आर. पी. एफ. (पाचोरा), जी. आर. पी. (पाचोरा) यांना लेखी पत्राद्वारे देण्यात आली आहे.