पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | संपुर्ण राज्यात अतितटीची मानली जाणारी जळगांव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या व्यवस्थापक समितीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली असुन १०० टक्के मतदान होत पाचोरा तालुक्यात ७६ पैकी ७६ मतादारांनी आपला मतादानाचा हक्क बजावला असुन आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जळगांव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित, जळगांव व्यवस्थापक समितीची सन – २०२२ ते सन २०२७ या कालावधीसाठी आज १० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. पाचोरा तालुक्यात राजकीय भुकंप करत शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. आ. दिलीप वाघ यांच्या समोर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात अनिल पाटील – स्मिता वाघ, भडगाव – रावसाहेब पाटील – डॉ. संजीव पाटील, भुसावळ – शालिनी मधुकर ढाके – शामल अतुल झांबरे, *बोदवड* – रविंद्र पाटील – मधुकर राणे, चाळीसगाव – प्रमोद पाटील – सुभाष पाटील, चोपडा – रोहित निकम – इंदिराबाई पाटील, धरणगाव – वाल्मिक पाटील – संजय पवार, एरंडोल – दगडु चौधरी – भागचंद जैन, जळगांव – मालतीबाई महाजन – गुलाबराव पाटील, जामनेर – गिरीष महाजन – दिनेश पाटील, मुक्ताईनगर – मंगेश चव्हाण – मंदाकिनी खडसे, पारोळा – चिमणराव पाटील – सतिष पाटील, रावेर – जगदिश बढे – ठकसेन पाटील, यावल – हेमराज चौधरी – नितीन चौधरी यांचेसह महिला राखीव मतदारसंघातुन – छाया देवकर, पुनम पाटील, सुनिता पाटील, उषाबाई पाटील, मनिषा सुर्यवंशी, इतर मागास प्रवर्ग मतदार संघासाठी – गोपाळ भंगाळे – पराग मोरे, विमुक्त जाती भटक्या जमाती व विमुक्त मागास प्रवर्ग मतदार संघासाठी अरविंद देशमुख – विजय पाटील, अनुसूचित जाती जमाती मतदार संघासाठी – श्रावण सदा ब्रम्हे – संजय सावकारे या उमेदवारांची मते मदपेटीत बंद झाली आहेत.
पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये पार पडली मतदान प्रक्रिया केंद्र प्रमुख गौतम बाविस्कर, एस. एस. पवार, ए. टी. पाटील, जितेंद्र जोशी, प्रेमसिंग पाटील या सहकार निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. आता या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.