पाचोरा, नंदू शेलकर । ऑनलाईन अभ्यास करणार्या मध्यमवर्गीय विद्यार्थीचा हरवलेला मोबाईल कॉंग्रेस सोशल मीडिया पदाधिकारीने प्रामाणिकपणे परत केल्याने विद्यार्थीचा आनंद गगनात मावेनासा झाला. शहरातील नवकार प्लाझा परीसरात साई पार्क परिसरात राहणाऱ्या दिनेश देविदास जाधव या शालेय विद्यार्थीचा मोबाईल हरवला सदरचा मोबाईल हा कॉंग्रेस सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे यांना सापडल्यावर त्यांनी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याकडे जमा केल्यावर ज्या विद्यार्थीचा मोबाईल हरवला त्याला कॉंग्रेस कार्यालयात बोलावून राहुल शिंदे यांनी प्रामाणिकपणे परत केला.
यावेळी सदर विद्यार्थी हा भावनावश झाला, जर मोबाईल मिळाला नसता तर माझे शालेय नुकसान झाले असते पुन्हा मोबाईल नवीन घेण्यासाठी अडचण होती त्यामुळे मी राहुल शिंदे यांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या परीने लहानसे बक्षीस देतो असे मोबाईल मालक जाधव याने सांगितले असता राहुल शिंदे यांनी बक्षीस घेण्यास देखील नकार दिला. यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी उपस्थित होते.