बंगळुरू (वृत्तसंस्था) पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्यांवर दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचा कायदा करण्यात यावा, असे विधान कर्नाटकसरकारमधील मंत्री बी.सी. पाटील यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी असदुद्दीन ओवैसींच्या सभेत अमूल्या लिओना या तरुणीने पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिल्यापासून वादाला तोंड फुटले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्यास अशी घोषणाबाजी करणाऱ्यांवर गोळ्या झाडण्यासाठी एक केंद्रीय कायदा असावा, असे बीसी पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारने देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तरतूद असणारा कायदा केला पाहिजे. देशद्रोह्यांना गोळ्या झाडण्याची तरतूद असलेला केंद्रीय कायदा लागू झाला पाहिजे, असे आवाहन मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना करणार असेही बीसी पाटील यांनी म्हटलेय.