जळगाव: पतीनिधी । बर्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आज शहर आणि परिसरात पावसाचे आगमन झाले
आज दुपारी साडे बारा वाजेपासूनच आकाशात ढग दाटून आले होते हवेतही गारवा जाणवत होता त्यामुळे उकाडा थोडा कमी झाला होता त्यानंतर दुपारी २ वाजता पाउस बरसायला सुरुवात झाली मध्यम लयीत कोसळणारा हा पूस जास्त वेळ असाच सुरु हवा असे सर्वांना वाटत होते थोडा उशीर झाला असला तरी आता शेतजमिनीत पेरणीयोग्य ओल मिळावी म्हणजे किमान २ फूट तरी ओल शेतीला धरून ठेवता येईल इवढा हा पूस कोसळावा आशी शेतकरी मनोमन विनवणी देवाला करीत होते
काही भागात दुबार पेरणीच्या चिंतेने कोरडवाहू शेतकरी आधी मेतुकुतीला आलेले असताना आज झालेले पावसाचे आगमन सगळ्यांना दिलासा देणारे ठरले आहे मध्यम स्वरूपाचा हा एका लयीतला हा पाउस जवळपास पाउणतास बसरत होता