पहूर, ता जामनेर : प्रतिनिधी । पहूर कसबे आणि पेठ या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या गावांमधील रहदारीची समस्या सोडवण्यासाठी सर्व्हिस रोड उभारणीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे
पहूर हे गांव जळगांव — औरंगाबाद महामार्गावरील चौफुलीवरील गांव असून येथे सध्या नवीन पुलाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या व पुलाच्या दोन्ही बाजूने एकीकडे पहूर पेठ व दूसर्याबाजूने पहूर कसबे असे दोन गांव आहेत. दोन्ही गावामध्ये जाणार्या पुलाच्या व हायवेच्या दोन्ही बाजूने असलेले रोड हे कायम रहदारीचे असतात. त्यामुळे दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड होणे गरजेचे आहे.सर्व्हिस रोड झाल्यास येणार्या जाणार्यांची सोय होणार आहे. असे निवेदन मानव संरक्षण समितीच्या जळगांव जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले
यावेळी जिल्हा महिला संघटक प्रतिभा कोल्हे, सुलताना तडवी, ऊज्वला झोपे, उत्तर महाराष्ट्र हेड व जनसंपर्क अधिकारी संतोष पाटील, जळगांव उपाध्यक्ष प्रकाश हिवरकर, जळगांव जिल्हा जनसंपर्क अधिकारी राजेंद्र दर्जी, दिपक सोनार, विनोद भामेरे, वालमीक सपकाळे आदी उपस्थित होते