पहूर येथे संत रूपलाल महाराज पुण्यतिथी साजरी

पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  बारी समाजाचे आराध्य दैवत श्री संत रूपलाल महाराज यांची 29 वी पुण्यतिथी संत रूपलाल  महाराज  यांच्या जन्म भूमीत पहूर येथे  साजरी करण्यात आली.

 

पुण्यतिथी ची सुरवात पालखी ची मिरवणूक काढून करण्यात आली .यावेळी प्रमुख आतिथीचा सत्कार करण्यात आला.  यावेळी समाजातील उच्च पदावर व उच्च शिक्षित समाज बांधवांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्तीत होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक खलसे   हे होते . तसेच माजी जिप कृषि सभापती प्रदीप  लोढा ,माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर  पांढरे, मुख्याध्यापक खलसे  व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश नागपुरे, खांजोडकर, सुरेश अस्वार, दिलीप ताडे  यांनी केले व समाज बांधवांनी श्री संत रूपलाल महाराज पुण्यतिथी समितिथील रमेश नागपुरे, रवींद्र काळे, सुकलाल बारी, किशोर बारी, अर्जुन बारी, ईश्वर बारी, विकास बारी ,प्रभाकर काळे ,ज्ञानदेव बुंदे, शांताराम बारी, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Protected Content