पहूर, रविंद्र लाठे – जगभरात कोरोना या विषारी व्हायरस ने थैमान घातले आहे. भारतातही या विषाणू चा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने खबरदारी चे उपाय अवलंबविले आहे. खबरदारी म्हणून राज्यभरात आठवडे बाजार, माँल, सिनेमा गृहे तसेच जेथे गर्दी होईल ते सर्व व्यवसाय, उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशांतील सरकार व नागरिक जनता वेगवेगळ्या पद्धतीने कोरोनावर मात करण्यासाठी झटत आहे. त्यामुळे खबरदारी चा उपाय म्हणून पहूर, ता.जामनेर येथील रविवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते.यातुन भाजीपाला विक्रेते व व्यापारी यांनी वेगळीच शव्कल लढवून पहूर येथील रविवारी भरणारा आठवडे बाजार शनिवार ( 21)रोजी पहूर बसस्थानक परिसरात भाजीपाला बाजार भरला. तसेच उद्या रविवारी पहूर येथे आठवडा बाजार असल्याचे लक्षात घेता व्यवसायिकांनी आज सकाळी पहुर येथील बसस्थानक परिसरात दुकाने लावण्यासाठी एकच गर्दी केली. वाढती गर्दी लक्षात घेऊन पहूर पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक राकेश सिंग परदेशी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दुकाने हटविण्याचे सांगितले असता व्यावसायिकांनी मज्जाव करीत पोलिसांशी हुज्जत घातली.
कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतांना. प्रशासनाने गर्दी न करण्याच्या सुचना दिल्या असतांना तसेच आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले असतांना सुद्धा भाजीपाला विक्रेते व व्यापारी यांनी बसस्थानक परिसरात दुकाने लावण्यासाठी एकच गर्दी केली. व लोकांनी ही कधी भाजीपाला मिळणारच नाही की काय? असे समजून तोबा गर्दी केली. पहूरसह परिसरात खेड्या पडद्यावरील लोकांनी गर्दी केली होती. पर्यायाने गर्दी कमी न होता ती वाढतच गेली.
पहूर पेठ ग्रामपंचायतीने दिले दुकाने बंद ठेवण्याच्या सुचनाजिल्हाअधिकारी जळगांव डाॅ. अविनाशजी ढाकणे सोबत यांच्या मार्गदर्शक सूचनेवरून जगभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात साथरोग प्रतिबंध कायदा 1887 लागू झाला असून आरोग्याच्या दृष्टीने गर्दी होईल म्हणून पानटपरी तसेच सर्व व्यापारी आपल्या दुकानाच्या आजुबाजुला साफसफाई ठेवणे तसेच दिनांक 31/03/2020 दुकाने बंद ठेवण्यात यावी. अशा आशयाचे लेखी सुचना सरपंच निताताई पाटील, उपसरपंच श्याम सावळे, व सर्व ग्रामपंचायत सदस्य पहूर पेठ च्या वतीने करण्यात आली आहे.