पहूर , ता . जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती पहुर येथे विविध शाळा संस्था संघटनांतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
पहूर पेठ येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर नगर येथून भव्य शोभायात्रेस प्रारंभ झाला . आठवडे बाजार मार्गे शोभायात्रा बस स्थानकाहून जामनेर रस्त्यावर असलेल्या बुद्ध विहार येथे आल्यानंतर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
प्रारंभी वर्षभरात विवाहबद्ध झालेल्या दांपत्यांच्या हस्ते बुद्ध पुजन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक दिनकर सुरळकर यांनी बुद्ध वंदना सादर केली . याप्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . यावेळी पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे , माजी सभापती बाबुराव घोंगडे , माजी जि. प .सदस्य राजधर पांढरे प्रफुल्ल लोढा , अॅड . संजय पाटील , विश्वनाथ वानखेडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
विजय मोरे यांनी सूत्रसंचालन केले तर माजी उपसरपंच रवींद्र मोरे यांनी आभार मानले . अभिवादन सभेत भास्कर पाटील , कैलास चव्हाण , व्ही . जी . भालेराव , माजी सरपंच शंकर जाधव , उपसरपंच राजू जाधव , श्यामराव सावळे , आर . बी . पाटील , किरण खैरणार , डॉ . प्रफुल्ल पांढरे , डॉ . गोपाल वानखेडे , अशोक सुरवाडे , शरद बेलपत्रे , सादिक शेख , गणेश तायडे , समता शिक्षक परिषदेचे जिल्हा सचिव शंकर भामेरे यांच्या सह समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महात्मा फुले शिक्षण संस्था
महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ . हेडगेवार प्राथमिक व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात वडाळीचे सरपंच संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . एम .एच . बारी , हरीभाऊ राऊत , अमोल क्षीरसागर , मनोज खोडपे यांच्यासह जागृती चौधरी या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले . प्रारंभी प्रतिमा पूजन करण्यात आले . कोमल तडवी या विद्यार्थिनीने संविधान गीत सादर केले .
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय देशमुख यांच्यासह सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे यांनी केले .आभार चंदेश सागर यांनी मानले .