पहूर प्रतिनिधी । येथील बसस्थानक परिसरातील मयूर प्रोव्हीजन हे नव्याने सुरू झालेल्या किराणा दुकानाच्या समोरून अज्ञात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल ७२० लिटर खाद्यतेलाची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बसस्थानक परीसरात फत्तेपूर येथील रहिवासी हर्षल अशोक तालेरा यांनी नुकतेच नविन दुकान सुरू केले आहे. फत्तेपूर येथून दररोज हे पहूर येथे ये-जा करीतात. नेहमी प्रमाणे दुकानासमोर खाद्य तेलाच्या चार टाक्या भरून ठेवल्या होत्या. तेलाची चोरी झाल्याचे लक्षात आले. सीसीटीव्ही कॅमेरेची तपासणी केली असता त्यात तोंडाला ४ जण रूमाल बांधलेले दिसून आले. बाजुला मालवाहतूक गाडी आढळल्याचे हर्षद यांनी सांगितले आहे. जवळपास ७२० लिटर ६० ते ७० हजार किमतीचे नुकसान झाले आहे.