पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठ मधील ख्वाँजानगर भागातील रहिवासी असलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीचा स्वॅब तपासणी अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा नोडल अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांनी दिली आहे.
पहूर पेठ ख्वाँजानगर येथील रहिवासी असलेल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणार्या एका कार्यकर्त्याचा दोन दिवसा पूर्वी पहूर ग्रामीण रुग्णालयात स्वॅब घेण्यात आला होता. त्यांचा अहवाल आज पॉझीटीव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील व कुटूंबातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येणार असून त्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे .पहूर पेठ ग्रामपंचायतीच्या वतीने बाधित व्यक्तीचा रहिवास असलेला भाग प्रतिबंधित करण्यात आला असून तेथे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. दरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.