पहूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून शाळेने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
अमृता गुणवंत सोनवणे या विद्यार्थिनीने ८७% गुण मिळवत शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला . सुहाना जाबीर तडवी ( हिवरखेडा ) हिने ८५ % गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला ,तर पल्लवी श्यामराव घाटे हिने ८४.८० % गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला .
गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन पालकांसमवेत मुख्याध्यापिका व्ही. व्ही. घोंगडे , उपमुख्याध्यापिका कल्पना बनकर , वर्गशिक्षक हरीभाऊ राऊत यांच्यासह सर्व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवून सत्कार केला. यावेळी सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुखदेव गीते यांच्यासह सर्व संचालक मंडळाने शाळेच्या देदीप्यमान यशाबद्दल अभिनंदन केले. सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे यांनी आभार मानले
आर. टी. लेले हायस्कूल शाळेचा शंभर टक्के निकाल
आर. टी. लेले हायस्कूलचा देखील शंभर टक्के निकाल लागला आहे. शाळेत एकूण 103 विद्यार्थी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे .प्रथम क्रमांकाने अक्षय एकनाथ लहासे 91.20%, द्वितीय क्रमांक समीक्षा लहानु दाभाडे 83.40%,तृतीय पंखाने उर्मिला राजू गायकवाड 83% टक्के मिळाले असून. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार गिरीश महाजन संस्थेचे व्हाईस चेअरमन साहेबराव देशमुख संस्थेचे सचिव डॉक्टर अनिकेत लेले शाळेचे मुख्याध्यापक आर बी पाटील सर प्रर्वक्षक एस व्ही पाटील लिपिक किशोर पाटील संस्थेचे सर्व संचालक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सर्व उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.