पहूर ता जामनेर प्रतिनिधी । येथील कोवीड सेंटर मधील पंधरा पैकी चौदा जणांचे कोरोना अहवाल आज निगेटीव्ह आले असून एकाचा रिपोर्ट अजून प्रलंबीत आहे.
याबाबत वृत्त असे की, पहूर येथील कोविड सेंटरमध्ये दोंदवाडा व पाळधी येथील पंधरा जणांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील पंधरा पैकी चौदा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोंदवाड्यातील एका व्यक्तीचा अहवाल प्रतिक्षेत असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हर्षल चांदा यांनी सांगितले आहे.
जनतेने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.