Home आरोग्य पहूरपेठचा कोरोना योध्दा ‘पॉझिटीव्ह’

पहूरपेठचा कोरोना योध्दा ‘पॉझिटीव्ह’

0
30

पहूर , ता . जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठ येथील ग्रामीण रूग्णालयात कार्यरत असणार्‍या ४३ वर्षीय कोरोना योद्ध्याला कोरोनाची बाधा झाली असल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे.

पहूर ग्रामीण रुग्णालयात आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवेचे कार्य करणार्‍या ४३ वर्षीय कोरोना योद्ध्यालाच आज कोरोनाने ग्रासले आहे. दरम्यान, आज दिवसभरातील तिसरी व्यक्ती पहूर पेठ येथे कोरोना बाधित झाल्याने संक्रमणाची साखळी कार्यान्वित होऊ नये यासाठी लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. कुणालाही खूपच अत्यावश्यक काम असेल तरच तोंडाला मास्क किंवा हातरुमाल बांधून बाहेर पडावे, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound