पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी)। येथील महावीर पब्लीक स्कूल येथील कोविड केअर सेंटरला आज तहसिलदार अरूण शेवाळे यांनी भेट देऊन रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली.
पहूर येथील कोविड सेंटरमध्ये पहूर येथील २, दोंदवाडे येथील ५, पाळधी येथील ८ तर जंगीपुरा आणि रोटवद येथील प्रत्येकी १ असे एकूण १७ जणांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल प्रतिक्षेत आहेत.
आज तहसिलदार अरुण शेवाळे यांनी भेटी प्रसंगी आवश्यक सुविधा पुरविल्याबाबत पहूर पेठ व पहूर कसबे ग्रामपंचायतींचे विषेश कौतूक केले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, सरपंचपती रामेश्वर पाटील, ग्रामविकास अधिकारी एम.एफ. म्हस्के, टेमकर भाऊसाहेब, तलाठी राठोड आप्पा, भारत पाटील आदींची उपस्थिती होती.