Home क्रीडा पहूरच्या अर्णवने स्केटिंग स्पर्धेत राज्यस्तरावर पटकावले रौप्यपदक

पहूरच्या अर्णवने स्केटिंग स्पर्धेत राज्यस्तरावर पटकावले रौप्यपदक


pahur arnav

पहूर ता.जामनेर, प्रतिनिधी | सुंदराबाई फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा मलकापूर येथील स्काँलर आँफ स्कुल येथे रविवारी (दि.१९) रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत येथील अर्णव मनोज जोशी याने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदक पटकावले आहे.

 

आठ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची ही स्पर्धा होती. अर्णव इयत्ता दुसरीच्या वर्गात असून लाँर्ड गणेशा इंग्लिश मेडियम स्कुलचा विद्यार्थी आहे. त्याला शिक्षक आनंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


Protected Content

Play sound