कोलकाता : वृत्तसंस्था । पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हिंसाचार उफाळल्याचं दृश्य दिसतंय. याच दरम्यान राज्यपाल जगदीप धनखड यांनी एक पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कायदे-व्यवस्थेवर चिंता व्यक्त केलीय.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जाब विचारताना ‘राज्यात बाहेरचं कोम आहे? बाहेरील त्या कोणाला म्हणत आहेत? भारतीय नागरिकही बाहेरचे आहेत का?’ असे प्रश्न राज्यपालांनी विचारले आहेत.
विरोधकांसाठी पश्चिम बंगालमध्ये जागा उरलेली नाही, असं म्हणताना ममता बॅनर्जी यांनी अशा पद्धतीची वक्तव्ये करू नयेत. ममतांनी आगीशी खेळू नये. मुख्यमंत्र्यांनी संविधानाच पालन करायला हवं, असं राज्यपालांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना उद्देशून केली