पशु पक्षी देखील देत आहेत घरी राहण्याचा संदेश

 

खामगाव, प्रतिनिधी। कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे लॉक डाऊन जाहीर करून घरात रहा, सुरक्षित रहा असे आवाहन केले आहे. या आवाहनाला काही नागरिक न जुमानता रस्त्यांवर फिरतांना दिसत आहेत. मात्र, पशु, पक्षी आवाहन पळतांना दिसत आहे. याचे बोलके छायाचित्र ‘लाईव्ह ट्रेंड न्युज’ चे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी टिपले आहे.

देशभरात लॉक डाऊनच्या काळात नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. यानुसार सर्वांना पुढील एकवीस दिवसाकरीता घरातच राहून कोरोना विरुद्धचा हा लढा लढायाचा आहे . याकरता विविध पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. लॉक डाउनच्या आवाहनाला खामगाव येथे पशु, पक्षी यांनी देखील प्रतिसाद दिला असल्याचे पाहावयास मिळत आहे. कबुतर व मांजर यांनी घरात प्रवेश करून मानवाला कोरोनापासून रक्षण करण्याकरिता घरातच रहा असा संदेश देत नाही आहे ना असे या बोलक्या छायाचित्रातूनतर दिसून येते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Protected Content