पशुसंवर्धन विभागामधील रिक्त पदे भरा : खडसेंची मागणी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरावीत अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत केली आहे.

गेल्या वर्षी राज्यात पशुधनावर लंपी नावाच्या आजाराने थैमान घातले होते या आजारात लाखो पशुधन मृत झाले
त्यावेळी पशुधनावर उपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग व आरोग्य यंत्रणा तोडकी पडली
अशी परिस्थिती परत उदभवू नये म्हणून राज्यातील पशुसंवर्धन विभागामधील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधानपरिषद गटनेते आ एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदे मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले की, ३० डिसेंबर, २०२२ रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकित प्रश्रोत्तारांच्या यादी क्रमांक १४ मधील प्रश्र क्रमांक ८९२१ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय ?

याप्रसंगी आमदार एकनाथराव खडसे यांनी पुढे विचारले की, पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे कार्यालयाने पशुसंवर्धन विभागातील गट-क ची एकूण १३८ रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक ०३ जुलै, २०१७ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात येऊन सुधारित आकृतीबंधाच्या संदर्भात वित्त विभागाकडून प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने उत्क भरती प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली आहे, हे खरे आहे काय ? असल्यास, सामान्य प्रशासन विभागाच्या (माहिती तंत्रज्ञान) शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी, २०२१ व दिनांक ४ मार्च, २०२१ मधील मार्गदर्शन सूचनांनुसार ओएमआर व्हेंडरद्वारे पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गामधील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागाच्या मान्यतेने करण्याचे संकल्पित करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय ? असल्यास, पशुधन विकास अधिकारी (गट-अ) यांची रिक्त असलेल्या ४३५ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सरळसेवेने भरण्याकरिता सन २०१९ मध्ये देण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक २२ डिसेंबर, २०१९ रोजी चाळणी परीक्षा घेण्यात आली असून सदर पदावर कायमस्वरूपी पदभरती होईपर्यंत ११ महिन्यांच्या कालावधीसाठी सदर पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत आहेत, हे ही खरे आहे काय ?
असल्यास, उत्क प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागातील पदे भरण्यास होत असलेल्या विलंब टाळून पात्र उमेदवार उपलब्ध करून घेणेसाठी पाठपुरावा करण्यात येऊन उत्क पदे जलदगतीने भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ? नसल्यास, विलंबाचे कारणे काय आहेत असा प्रश्न एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला.

एकनाथराव खडसे यांच्या प्रश्नाला पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले पशुसंवर्धन आयुक्तालय, औंध, पुणे कार्यालयाने पशुसंवर्धन विभागातील गट-क ची एकूण १३८ रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक ०३ जुलै, २०१७ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात येऊन सुधारित आकृतीबंधाच्या संदर्भात वित्त विभागाकडून प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने उत्क भरती प्रक्रियेस स्थगिती देण्यात आलेली आहे,
वित्त विभागाद्वारे स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदभरती वरील निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या शासन निर्णय १७/०१/२०२३ अन्वये सन २०१७ मधील पदभरती रद्द करण्यात येवून, शासनाच्या प्रचलित धोरणानुसार वाढीव पदांचा समावेश करून नवीन पदभरती करणेबाबत निर्देश देण्यात आले असून, या अनुषंगाने पदभरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी खइझड कंपनीची निवड करण्यात आली आहे.
जाहिरात क्र. १३/२०१९ च्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्राप्त शिफारशींनुसार शासन आदेश दिनांक ०८/०२/२०२२ अन्वये एकूण ४२८ उमेदवारांना पशुधन विकास अधिकारी (गट-अ) पदावर नियमित नियुक्ती देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुसंवर्धन विभागातील सहायक आयुक्त पशुसंवर्धन (गट-अ) संवर्गाची ५६ रित्क पदे आणि पशुधन विकास अधिकारी (गट-अ) संवर्गाची २९८ रित्क पदे सरळसेवेने भरण्याबाबत दिनांक २६/१२/२०२२ रोजी चाळणी परीक्षा झालेली आहे. या अनुषंगाने आयोगाद्वारे उमेदवारांची निवड होवून विभागात शिफारस प्राप्त झाल्यानंतर सदरहू रित्क पदे भरण्याचे संकल्पित आहे.
तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये पशुसंवर्धन आयुत्कालयांतर्गत पशुधन पर्यवेक्षक (गट-क) संवर्गातील व वरिष्ठ लिपिक (गट-क) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता खइझड (इंस्टीटयुट ऑफ बकिग पर्सोनल सिलेक्शन ) कंपनीची निवड करण्यात आली असून, पदभरतीची कार्यवाही सुरू आहे असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

Protected Content