जळगाव प्रतिनिधी | खाजगी व शासकीय पशुवैद्यकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात बेमुदत काम बंद करून उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
यावेळी सर्व पशु पदविका धारकांचे राज्यव्यापी पदाधिकारी उपस्थित राहून जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देणार आहेत .
खाजगी लघु पशु वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डॉक्टरांच्या विविध मागण्या गेल्या काही वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील यावर कुठलीही उपाययोजना होत नसल्याने 15 जुलैपासून पशु चिकित्सक व्यवसायिक संघटना व खाजगी पशुचिकित्सक संघटना यांच्यातर्फे राज्यभरात बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.
विविध मागण्या तात्काळ पूर्ण व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पशु पदविका धारक संघटनेचे पदाधिकारी निवेदन देणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन सोमवारी करण्यात येणार आहे. या आंदोलनाठिकाणी कोरोना संसर्गसंदर्भात नियम पाळून आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.या आंदोलनात जिल्ह्यातील पशु पदविकाधारकांचे पदाधिकारी व डॉक्टर्स यांनी उपस्थित रहावे असे आवाहन खाजगी पशु वैद्यकीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ दीपक लोखंडे, शासकीय पशु वैद्यकिय संघटना अध्यक्ष डॉ हेमंत पाटील यांनी केले आहे.