Home Cities जळगाव पलोड शाळेत लाल रंगाची उधळण

पलोड शाळेत लाल रंगाची उधळण

0
34

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक विभागात “लाल रंग दिवस” जोशात साजरा करण्यात आला.

पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना लाल रंगाची ओळख व्हावी लाल रंग दिनाचे औचित्य साधून पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती देण्यात आली. तसेच लाल रंग दिवसानिमित्ताने लाल रंगाच्या वस्तू टेबलावर मांडण्यात आल्या. तनिष्क खंडाळे व दुष्यंत शेवाळे या विद्यार्थ्यांनी लाल रंगाची माहिती सांगितली. पृथा कापुरे या विद्यार्थीनीने लाल रंगाचे गाणे म्हटले. मुलांना लाल रंगाची गोष्ट सांगण्यात आली. तसेच लाल रंगाची जादू दाखविण्यात आली. सर्व शिक्षिका व विद्यार्थी लाल रंगाचे कपडे परिधान करून आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख निलिमा शुक्ला होत्या. सदर कार्यक्रमाला समन्वयिका अनघा सागडे यांचे मार्गदर्शन लाभले.

 


Protected Content

Play sound