भुसावळ दत्तात्रय गुरव | रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व भुसावळ नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सायक्लोथाँनचे (मँरेथान) आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एक हजार सायकल स्वार सहभागी झाले होते.
रोटरी क्लब आँफ भुसावळ रेल सिटी गेल्या चार वर्षापासून शहरांमध्ये प्रदूषण मुक्तता आणि आरोग्याचा संदेश देण्यासाठी सायक्लोथॉनचे आयोजन करीत असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले आहे . आपले स्वास्थ चांगले रहावे त्याच प्रमाणे पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून रोटरीतर्फे रन भुसावळ रनचे हि आयोजन करण्यात येत असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/514153020134504