परसाडेच्या प्रेमी युगुलांची आत्महत्या की खुन ? मयत तरूणाच्या पित्याला संशय

 यावल :  प्रतिनिधी ।  तालुक्यातील परसाडे शिवारात प्रेमसंबधातुन आत्महत्या केल्याच्या  घटनेबाबत मयत तरूण शाहरूख तडवी व मिना तडवी दोघांनी आत्महत्या केली की त्यांचे  खुन करण्यात आले ? ; याबद्दल  तरूणाच्या कुटुंबांने व पालकाने  पोलीसांची भेट घेवुन संशय व्यक्त केला आहे 

 

याबाबत अज्ञात लोकांविरूद्ध दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल होण्याचे संकेत मिळाले आहे . मयत शाहरूखचे वडील बाबु तडवी यांनी दिलेली माहीती अशी की , हरिपुरा ( ता – यावल ) येथे  राहणारा शाहरुख बाबु तडवी ( वय १९ ) आणि मिना शावखा तडवी ( वय २२ ,  रा – परसाडे,  ता – यावल  ) या दोघांनी मिळुन आपल्या प्रेमसंबंधास कुटुंबाकडुन मिळणाऱ्या नकारास कंटाळुन अखेर १३ एप्रीलरोजी दुपारी परसाडे शिवारातील खडकाई नदीच्या पायथ्याशी पुष्पा गडे यांच्या शेतात निंबाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन जिवनयात्रा संपवली होती .

 

शाहरुख तडवी याचा १३ एप्रीलरोजीच चिनावल येथील एका ठिकाणी स्थळ जुळल्याने साखरपुड्याचा कार्यक्रम होता .आत्महत्या करण्याच्या काही तास आधी  त्यांनी यावल पोलीस स्टेशनमध्ये जावुन पोलीसांची भेट घेवुन आपण एकमेकांवर प्रेम करीत असल्याची माहीती  दिली होती .पोलीसांना भेटुन घेल्यानंतर काही तासातच असे काय घडले की त्यांना आत्महत्या करण्याचा मार्ग पत्कारावा लागला , आत्महत्या केलेल्या तरूणाच्या पायावर व शरीरावर काही ठीकाणी जखमांच्या खुणा होत्या   शाहरूखचे वडील बाबु  तडवी यांनी या सर्व घडलेल्या घटनावर संशय व्यक्त व्यक्त  केला आहे  आपण त्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट बघत असल्याचे शाहरूखचे वडील बाबू तडवी यांनी सांगीतले  लवकरच  घटनेच्या मागची सत्य परिस्थिती समोर येईल व  या दोघांनी आत्महत्या केल्या की त्यांचा खुन झाला ? या  प्रश्नाचे उत्तर   मिळेल  त्यानंतर  आपण निर्णायक भुमीका घेवु असे बाबु  तडवी यांनी म्हटले आहे .

 

Protected Content