Home Cities जळगाव परवानगी नाकारली तरी संविधान जागर सभा होणारच-प्रतिभा शिंदे (व्हिडीओ)

परवानगी नाकारली तरी संविधान जागर सभा होणारच-प्रतिभा शिंदे (व्हिडीओ)


pratibha

जळगाव प्रतिनिधी । प्रशासनाने परवानगी नाकारली तरी संविधान जागर सभा होणारच असल्याचा दावा आज पुरोगाची संघटनांतर्फे प्रतिभा शिंदे यांनी केला.

आज भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन उमर खालीदसह इतरांना जिल्हा बंदी करण्याची मागणी केली. यानंतर पुरोगाची संघटनांतर्फे प्रतिभा शिंदे यांच्यासह इतरांनी पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी संविधान जागर कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याची मागणी ही अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, या सभेत येणार्‍या कुणावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल नसून परवानगी नाही दिली तरी हा कार्यक्रम होणारच आहे. याप्रसंगी मुकुंद सपकाळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/616042139181443/


Protected Content

Play sound