पदवीच्या शेवटच्या वर्षांतील विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबर पर्यंत परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत

 

शेंदूर्णी, प्रतिनिधी । कला, वाणिज्य व विज्ञान पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले असून विद्यार्थ्यांनी लवकरतात लवकर विद्यापीठाच्या वेबसाइटवर परीक्षा फॉर्म भरावा असे आवाहन अप्पासाहेब र.भा.गरूड कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.आर.पाटील यांनी आवाहन सोशल मीडियाद्वारे केले आहे

शेंदुर्णी परिसरातील सर्व पालक, महाविद्यालयाशी संबंधित हितचिंतक यांनी आपल्या परिसरातील बऱ्याचशा गावांतील कॉलेजला पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असून त्यांची परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहे. १५सप्टेंबर २०२०च्या आत सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईट वर फॉर्म भरायचा आहे.

फार्म भरण्यासाठी कमी दिवसांचा कालावधी असून आपली परीक्षाही काही दिवसांत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना निरोप देणे वेळ आभावी शक्य नाही म्हणून परिसरातील नागरीक पालक व मित्र मंडळींनी सदरचा निरोप आपल्या परिसरातील पदवीच्या शेवटच्या वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यां पर्यंत पोहचवून पदवीच्या शेवटच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फार्म भरण्याची संधी हुकू नये म्हणून सहकार्य करावे असे आवाहन प्राचार्य डॉ. व्ही.आर.पाटील यांनी केले आहे.

त्यासाठी आपल्या गावातील, मित्र मंडळीतील व्हाट्स अँप ग्रुप वर गरूड महाविद्यालयात १५ सप्टेंबर पर्यंत पदवी परीक्षा फार्म भरणे सुरु असल्याचा मेसेज पाठवून जर का आपण एक छोटीशी मदत केली तर त्यांचं भविष्य घडू शकतं, आपण आपल्या परिसरातील सर्व गावांपर्यंत गावातील ग्रुप मध्ये पाठवा, जेणेकरून विद्यार्थ्यांचे आयुष्याचे नुकसान होणार नाही. अगदी अतिदुर्गम भागापर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोचवण्याचा प्रयत्न करूया असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content