यावल प्रतिनिधी । तालुक्यातील पथराळे या गावात येथे आजपासुन संगीतमय भागवत कथा व अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहाला सुरुवात होत असुन या कीर्तन सप्ताहाची सांगता ७ मार्च रोजी ह.भ.प. करपात्री चांगदेव महाराज चंद्रपुरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
या सप्ताहात त्यानिमित्ताने पथराळे येथे रोज सकाळी ४ ते ५ ग्रामसफाई, ५ ते ६ काकडा आरती, सकाळी ९ ते ११ भागवत कथा, दुपारी २ ते ५ भागवत कथा, सध्या ६ ते ७ हरीपाठ व रात्री ९ ते ११ रोज कीर्तन होणार आहे.
२९ रोजी फेब्रुवारी रोजी संतोष महाराज पंढरपूरकर, १ मार्च रोजी ह.भ.प.हिराबाई महाराज अहमदनगरकर, २ मार्च रोजी नारायण महाराज मेहुणकर, ३ मार्च रोजी श्याम महाराज घोडगावकर, ४ मार्च रोजी मनोज महाराज सारगावकर, ५ मार्च रोजी मिराबाई महाराज लींगायतकर ,६ मार्च रोजी जनाबाई महाराज साळशींगीकर व ७ मार्च रोजी करपात्री चांगदेव महाराज यांचा काल्याच्या कीर्तनातुन सप्ताहाची सांगता होणार आहे.
७ मार्च रोजी दुपारी महाप्रसाद व दिंडी सोहळा निघणार असुन परीसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक ह.भ.प.चांगदेव महाराज, ग्रामपंचायत सदस्य प्रतापदादा सोनवणे, पोलीस पाटील चद्रंभान सोनवणे सह पथराडे ग्रामस्थानी केले आहे.