पहूर येथे शिक्षक पालक सभा उत्साहात

पहूर, प्रतिनिधी । डाॅ. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ शेंदूर्णी संचलित सरस्वती विद्यामंदिर व श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व लिटिल चॅम्प्स गार्डन इंग्लिश मेडियम स्कुल शेंदूर्णीचा शिक्षक पालक मेळावा घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  पंचायत समिती माजी सभापती बाबुराव घोंगडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पहूर पेठ चे सरंपच निताताई पाटील, पहूर कसबे चे सरपंच ज्योती ताई घोंगडे, रामेश्वर पाटील, माजी उपसरपंच रवी मोरे, सुधाकर सुरडकर, सानप दादा, वासुदेव घोंगडे, लक्ष्मण गोरे, एकनाथ लहासे, श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमती शिला पाटील हे उपस्थित होते.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डाॅ. कुमुदिनी साने, मनोगत नीताताई पाटील, राजेंद्र पाटीलसर,बोलताना सांगितले की गोरगरीब, होतकरू जे शालेय शिक्षण घेऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना शाळेत मोफत  शालेय शिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  शाळेविषयी प्रगतीचा आलेख व सखोल मार्गदर्शन केले सुत्रसंचालन प्रमोद सरोदे सर यांनी तर आभार अजय गुरूजी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content