पत्र्याच्या शेडमध्ये एकाने घेतला गळफास

धरणगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी । तालुक्यातील मुसळी येथील ५० वर्षीय व्यक्तीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, पांडूरंग पुंडलिक जाधव (वय-५०) रा. मुसळी पो. वराड ता. धरणगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला होते. शुक्रवारी १ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गावाच्या बाहेर असलेल्या खळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी दसुरे यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश भालेराव करीत आहे.

Protected Content