पत्रकाराच्या नावाने फोन करणाऱ्यासह त्याला मारहाण करणाऱ्यावर कारवाई करा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कांचन नगर परिसरात रात्री उशीरापर्यंत सुरु असलेला कार्यक्रम पत्रकाराच्या नावाने अज्ञात व्यक्तीने फोन करुन बंद पाडला, तसेच प्रत्यक्षात खात्री न करता पत्रकाराला जबाबदार धरुन कार्यक्रमस्थळी एकाने पत्रकाराला मारहाण केल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पत्रकाराच्या नावाने फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीसह पोलीस कर्मचारी, तसेच मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन जळगाव शहरातील सर्व पत्रकारांनी  गुरुवार, १ सप्टेंबर रोजी  पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना दिले आहे.

 

कांचन नगर परिसरात ३० ऑगस्ट रोजी रात्री उशीरापर्यंत हरतालिकेनिमित्ताने कार्यक्रम सुरु होता. याचा त्रास होत असल्याने तसेच वेळेबाबतचे नियम असतांनाही उशीरापर्यंत सुरु असलेल्या कार्यक्रमाची एका अज्ञात व्यक्तीने जुगल पाटील या पत्रकारांच्या नावाने शनिपेठ पोलिसात फोन केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांची गाडी तसेच कर्मचारी पाठविला. व कार्यक्रम बंद केला. यावेळी आयोजकांनी फोन कुणी केला याबाबत विचारले असता, पोलिसांनी कुठलीही खात्री न करता प्रत्यक्षात फोन न करणाऱ्या पत्रकाराचे नाव कार्यक्रमाच्या आयोजकांना सांगितले. त्यानंतर आयोजकांपैकी एकाने पत्रकार जुगल पाटील यांना बोलावून घेतले. याठिकाणी जुगल पाटील यांनी संबंधितांना मी फोन केला नसल्याची बाब सांगितली. तसेच फोन तपासून घ्यावा असे सुध्दा सांगितले. मात्र कार्यक्रमस्थळी  बापू नामक व्यक्तीने पत्रकार जुगल पाटील यांना मारहाण केली. याप्रकरणी पत्रकाराच्या नावाने फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्ती, तसेच खात्री न करता पत्रकाराचे नाव कार्यक्रमाच्या आयोजकांना सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर तसेच कार्यक्रमास्थळी पत्रकाराला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे.

 

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, पत्रकार चंद्रशेखर नेवे, मनीष जोगी, नरेंद्र कदम, अनिल केऱ्हाळे, अय्याज मोहसीन, संतोष सोनवणे, प्रशांत भदाणे, सागर दुबे, नितीन नांदुरकर, किशोर पाटील, अभिजित पाटील, हेमंत पाटील,  संजय महाजन, तुषार भामरे, चेतन वाणी, कमलेश देवरे, दिपक सपकाळे, नाजनीन शेख, संदीपाल वानखेडे, जितेंद्र कोतवाल, भूषण हंसकर, सुमीत देशमुख, वसीम शेख यांच्यासह इतर सर्व माध्यमांचे प्रतिनिधी तसेच पत्रकार उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकारांना पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण

Protected Content