फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘महाराष्ट्र राज्याचे सहकार विभागाने सहकारी पतसंस्थावर आकारलेले अंशदान परिपत्रक रद्द करावे.’ अशी मागणी करत यासंदर्भात आमदार शिरीष चौधरी यासह इतर आमदार व जिल्हा उपनिबंधक यांना सहकार भारतीने निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र राज्याचे सहकार विभागाने सहकारी पतसंस्थाकडून अंशदान आकारणी केल्याबाबतचे परिपत्रक काढले असून ही आकारणी सन २०१९ पासून प्रति आर्थिक वर्ष शेकडा १० पैसे याप्रमाणे ठेवीचे रकमेवर केली जात आहे व ही रक्कम १०० दिवसांचा वसुली कार्यक्रम राबवून करणार असल्याचे जाहीर झाले आहे.
ही बाब पतसंस्थावर अन्याय करणारी असून ही आकारणी रद्द करावी. म्हणून राज्य पातळीवर सहकार भारतीने मागणी केली आहे. याबाबतचे मागणीचे निवेदन महाराष्ट्रतील आमदार व जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आले. हे निवेदन रावेर विधानसभा आमदार शिरीष चौधरी यांना सहकार भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सातपुडा व लॅक्समी नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन नरेंद्र नारखेडे व संचालक हेमराज चौधरी यांनी निवेदन दिले.
सरकारचे कोणतेही पतसंस्था ना अनुदान अथवा भागभांडवल दिले जात नाही किंवा ठेवीचे विमा संरक्षण कार्यक्रम नाही केवळ अंशदान मधून कोट्यवधीरुपये वसूल करणे म्हणजे संस्थांना आर्थिक दुर्बल करण्याचा प्रयत्न आहे हे परिपत्रक त्वरित रद्द करून मिळावे अशी विनंती यावेळी जिल्हा उपनिबंधक संतोष बीडवे यांचेकडे केली आहे.