Home Uncategorized पतंजलीचे कोरोनावरील औषध बाजारात ; हरिद्वारमध्ये झाले उद्धाटन !

पतंजलीचे कोरोनावरील औषध बाजारात ; हरिद्वारमध्ये झाले उद्धाटन !


हरिद्वार (वृत्तसंस्था) संपूर्ण देश आणि जग कोठे तरी कोरोनावरील औषध निघेल या आशेवर होते. आज आम्ही कोरोनाचे पहिले आयुर्वेदिक औषधं शोधले, असा दावा योगगुरु रामदेव बाबा यांनी केला आहे. त्यांनी हरिद्वार येथे या औषधाचे उद्धाटन केले. श्वासारी वटी कोरोनील असे या औषधाचे नाव आहे.

 

योगगुरु रामदेव बाबा यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर पहिले आयुर्वेदिक औषध शोधल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. या औषधामुळे १०० टक्के रुग्ण बरे होतात आणि ० टक्के मृत्यूदर असल्याचाही दावा रामदेव बाबा यांनी केला होता. उद्धाटन प्रसंगी रामदेव बाबा म्हणाले, पतंजली संशोधन संस्था आणि निम्स यांच्या संयुक्त विद्यमाने या औषधाचे संशोधन करण्यात आले. ही औषधं वैद्यकीय तपासण्या आणि चाचण्यांमध्ये देखील सिद्ध झाले असल्याचेही रामदेव बाबा म्हणाले.


Protected Content

Play sound