मुंबई प्रतिनिधी । शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणार्या गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेत त्यांनी तोंड सांभाळून बोलावे असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/Advt-2.jpg)
भाजप नेते आ. गोपीचंद पडळकर यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना असून त्यांनी धनगर आरक्षणासाठी काहीही केले नसल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. पडळकर यांनी तोंड सांभाळून बोलावे असा इशारा त्यांनी दिला आहे. पडळकर यांच्या सारख्या लोकांकडे लक्ष देण्याची गरज नसून त्यांची जागा महाराष्ट्रच दाखवून देणार असल्याचेही आव्हाड म्हणाले.