Home आरोग्य पंतप्रधान मोदींनी केले भुसावळच्या केळकर दाम्पत्याचे कौतुक ! (व्हिडीओ)

पंतप्रधान मोदींनी केले भुसावळच्या केळकर दाम्पत्याचे कौतुक ! (व्हिडीओ)

0
34

भुसावळ संतोष शेलोडे । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमाच्या ताज्या एपिसोडमध्ये भुसावळ येथील डॉ. आशुतोष केळकर आणि डॉ. सौ. सुजाता केळकर या दाम्पत्याची माऊथ ऑर्गन वादनाची क्लिप दाखविली. लॉकडाऊनच्या कालावधीत लोक विविध प्रकारे आपले छंद जोपासत असल्याचा उल्लेख करतांना ही क्लिप दाखविण्यात आली.

केळकर दाम्पत्य हे प्रतिथयश वैद्यकीय व्यावसायिक आहेत. हौशी माऊथ ऑर्गन वादक असून ते सोशल मीडियातील ख्यातनाम व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. पंतप्रधानांनी त्यांच्या कलेचे कौतुक केल्याने या कुटुंबासह भुसावळचाही लौकीक वाढला आहे. पहा त्यांच्याबाबत पंतप्रधान मोदी नेमके काय म्हणालेत ते ? आणि यानंतर डॉ. आशुतोष आणि सौ. सुजाता केळकर यांच्या एका बहारदार गीताला सादर करण्यात आले आहे.

खालील व्हिडीओत पहा याबाबतचा वृत्तांत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/680729166009029


Protected Content

Play sound