नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत-चीन सीमेवरील तणाव सातत्याने वाढणाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेह दौऱ्यानंतर आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे, भारत इतिहासाच्या एका नाजूक वळणावरून जात आहे. आपण एकाच वेळी अनेक दहशतवादी आणि देशाबाहेरील आव्हानांचा सामना करत आहोत. मात्र आपल्याला जी आव्हानं दिली जात आहेत, त्याचां सामना करण्यासाठी आपण दृढ निश्चयी असायला हवे, असे महत्वाचे ट्विट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही देखील केले आहे. दरम्यान, गलवान खोऱ्यात झालेला भारत-चीन संघर्ष आणि त्यामुळे भारत-चीन सीमेवर असलेला तणाव, कोरोना, पाकिस्तानकरे होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन यासारख्या अनेक राष्ट्रीय घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.