पंतप्रधानांच्या आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद (video)

जळगाव प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला आज जिल्हाभरातून अतिशय उदंड प्रतिसाद लाभला. दीवे आणि मोबाईल फ्लॅश लाईटने परिसर उजळून निघाला. तर काही मंडळीने फटाके फोडून दिवाळीदेखील साजरी केली.

पंतप्रधान मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांपर्यंत वीज बंद करून दिवे अथवा मोबाईल फ्लॅशलाईट सुरू करून कोरोना विरूध्दच्या लढ्यात आपण सर्व एकत्र असल्याचे दाखवून देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद लाभला. नऊ वाजेनंतर नऊ मिनिटांपर्यंत सर्वत्र अंधकार पसरला. याच कालावधी घरांसह रस्त्यांवर लक्षावधी दिवे प्रज्ज्वलीत करण्यात आले. जिल्ह्यातील मान्यवरांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी या मोहिमेत हिरीरीने सहभाग घेतला. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे व उन्मेषदादा पाटील यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी आपापल्या घरी दीप प्रज्ज्वलीत करून पंतप्रधानांच्या मोहिमेला पाठींबा दिला.

नऊ मिनिटांपर्यंत अनेक ठिकाणी स्तोत्र पठण करण्यात आले. काहींनी शंखनाद केला. तर बर्‍याच अति उत्साही मंडळीने फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. यामुळे एप्रिल महिन्यातच दिवाळी साजरी झाल्याचा फिल आला. यामुळे कोरोना विरूध्दच्या लढ्याचे गांभिर्य कमी झाल्याची अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अर्थात, काही जिल्ह्यातून पंतप्रधानांच्या मोहिमेला अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/222380035521473

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content