अमृतसर (वृत्तसंस्था) करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंजाब सरकारने बस, ऑटो रिक्षा आणि टेम्पो यासारखी सार्वजनिक वाहतुकीवर बंदी घातली आहे.
पंजाबमध्ये आतापर्यंत करोनाची दोन प्रकरणं समोर आली आहे. जर्मनी आणि इटलीचा प्रवास केलेल्या एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. बुधवारी त्याचा मृत्यू झाला. तर चंदिगडमध्ये करोनाची लागण झाल्याचा पहिली रुग्ण सापडला होता. पंजाब सरकारने तयारीच आढावा घेण्यासाठी आज बैठक बोलावली होती. यावेळी सार्वजनिक वाहतुकीवर शुक्रवार मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणत्याही ठिकाणी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी २० हून जास्त लोकांनी एकत्र येण्यावर निर्बंध आणले आहेत. दरम्यान, राज्यातील जे लोक बाहेर किंवा अन्य ठिकाणी आहेत त्यांना लवकरात लवकर आपल्या घरी पोहोचण्यासाठी उद्यापर्यंतची वेळ देण्यात आली आहे.