पंजशीरमध्ये लढाईत तालिबानचे 800 दहशतवादी ठार

 

काबुल : वृत्तसंस्था । अफगाणिस्तानमधील पंजशीर खोरे हा त्या देशाचा एकमेव भाग आहे, जो तालिबानच्या नियंत्रणाबाहेर आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान सैन्यही कडवी झुंज देत आहे. आतापर्यंत तब्बल 800 तालिबानी दहशतवाद्यांना या ठिकाणी ठार मारण्यात आलं आहे.

 

युद्धग्रस्त अफगाणिस्तान वेगाने तालिबानच्या नियंत्रणाखाली आला, पण तालिबानी दहशतवाद्यांनाना पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवता आलेला नाही. तसेच पंजशीर खोऱ्यातून तालिबानला आव्हान दिले जात आहे. हेच कारण आहे की, तालिबानलाही पंजशीर खोऱ्याबद्दल चिंता वाटू लागलीय आणि त्यांनीसुद्धा बंदुकीचा भाषा करायला सुरुवात केलीय. मसूदच्या नेतृत्त्वाखाली सैनिक हे खोरे मिळवण्यासाठी युद्ध करत आहेत.

 

हिंदुकुश पर्वतरांगांनी वेढलेले पंजशीर खोरे फार पूर्वीपासून तालिबानविरोधी शक्तींचे केंद्र आहे. अफगाण नेता अहमद शाह मसूदने सोव्हिएत-अफगाण युद्ध आणि तालिबानशी युद्धादरम्यान 2001 मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत पंजशीर खोऱ्याचे संरक्षण केले. यामुळेच येथील लोकांनी पुन्हा एकदा शस्त्र हाती घेतलीत.

 

Protected Content