भुसावळलाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिकांचे नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत सरसकट मिळावी अशीमागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
जिल्हयासह भुसावळ तालुक्यातील केळी,कापूस,हरभरा,मका, गहु उत्पादक शेतकरी शेतमालाला रास्त हमीभाव नसल्यामुळे संकटात सापडलेला असतांना,सरकारच्या अनावस्थेमुळे हवालदिल झाला आहे.
त्यात काल परवा झालेल्या अवकाळी पाऊस व वादळांमुळे या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून केळी,कापूस,हरभरा,मका, गहु व अन्य पिकांचे नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करून कोरडवाहु शेतकऱ्याला हेक्ट्री 25000/व बागायतदार शेतकऱ्याला 35000 रु हेक्टरी मदत सरसकट मिळावी अशीमागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष अतुल चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख महेश सोनवणे,युवक शहराध्यक्ष रणजीत चावरिया,गटप्रमुख लक्ष्मण सपकाळे, शहर कार्याध्यक्ष विशाल ठोके, तालुका कार्याध्यक्ष अनिस खान लोधी, तुषार चौधरी, निलेश जाधव, सचिन पाटील, ओंकार तायडे , प्रशित जोहरे, निलेश कोलते ,सलीम तडवी ,राजू भोई व आदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित निदर्शने करून तहसीलदार दिपक धिवरे यांना निवेदन देण्यात आले.