वेलिंग्टन, वृत्तसंस्था । भारतार वाढत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या पाहता न्यूझीलंडने भारतीयांना देशात प्रवेश बंदी केली आहे. याबाबत न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अडर्न यांनी गुरुवारी याची घोषणा करत ही प्रवेशबंदी अल्पकाळासाठी असणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान जेसिंडा अडर्न यांनी फक्त भारतीयांनाच नव्हे तर भारतात असणाऱ्या न्यूझीलंडच्या नागरिकांनाही देशात येण्यास मनाई केली आहे. भारतात वाढत असलेल्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना न्यूझीलंडमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यूझीलंडमध्ये ११ एप्रिलपासून ही प्रवेश बंदी सुरू होणार असून २८ एप्रिलपर्यंत लागू असणार आहे. या कालावधीत न्यूझीलंड सरकार रिस्क मॅनेजमेंट अधिक मजबूत करण्यावर भर देणार आहे. न्यूझीलंडने करोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले होते. त्यामुळे जगभरातून पंतप्रधान जेसिंडा अडर्न यांचे कौतुक झाले होते.