न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत खडकदेवळा येथे फिरते लोक न्यायालय (व्हिडिओ )

पाचोरा, प्रतिनिधी  ।  न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यात आज पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथे फिरते लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यात तडजोडीनंतर  १८ लाख ७५ हजार ४३२ ची वसुली करण्यात आली. 

 

दिवाणी न्यायाधीश एफ. के. सिद्धिकी,  सह दिवाणी न्यायाधीश एल. वी. श्रीखंडे, प्रभारी गटविकास अधिकारी विलास सनेर, तालुका वकील संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अरुण भोई मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कायदेविषयक शिबीराने करण्यात आली.  प्रास्ताविक अॅड. प्रवीण पाटील यांनी केले. या शिबिरात जागतिक पर्यावरण या विषयावर अॅड. चंदनसिंग राजपूत यांनी तसेच बाल कामगार या विषयावर अॅड. रवींद्र पाटील यांनी, महसुली कायदे व योगा या विषयावर अॅड. स्वप्नील पाटील तसेच वरिष्ठ नागरिक कायदा या विषयावर अॅड. अनिल पाटील तर बालकांचे हक्क मोफत शिक्षण कायदा, बालकांचे पोषण सुरक्षा कायदा याविषयी सहदिवाणी न्यायाधीश श्रीखंडे यांनी मार्गदर्शन केले. न्या. एफ. के. सिद्दिकी यांनी आपत्तीग्रस्तांसाठी विधी सेवा योजना यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अॅड. प्रवीण पाटील यांनी तर सूत्रसंचालन अॅड. कैलास सोनवणे यांनी केले.  या फिरते लोक न्यायालयात एकूण ३३ केस निकाली काढण्यात आल्या. यात एकूण  १८ लाख ७५ हजार ४३२ रुपयांची वसुली होवून तडजोड करण्यात आली. फिरते लोक न्यायालय  यशस्वीतेसाठी विधी सेवेचे बी. एम. भोसले, डी. के. तायडे, अनिल गोंधने,  होतीलाल पाटील, मुकेश पाटील, स्वप्नील पाटील, नितीन कदम तसेच पाचोरा पोलिस स्टेशन, जिल्हा परिषद शाळा, खडकदेवळा खु” येथील कर्मचारी, ग्रामसेवक राजेंद्र पाटील, विस्तार अधिकारी सुनील पाटील तसेच ज्येष्ठ वकील बांधव, पक्षकार यांनी परिश्रम घेतले.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/3012447655706469

 

Protected Content