अहमदनगर (वृत्तसंस्था) सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना रुग्णसंख्या कमी होईल. तर नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल, असा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
मुश्रीफ आज अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर दौऱ्यावर आले होते. यावेळी मुश्रीफ यांनी कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या संगमनेरमध्ये एक बैठकीत म्हटले की, नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल. तसेच सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना रुग्णसंख्या कमी होईल, असा विश्वासही हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मुंबई, पुण्याहून आलेल्या लोकांमुळे अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व्हे वाढवण्यासोबत कोरोना चाचण्या वाढवाव्यात, असे आदेशही हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. तर लक्षणे आढळल्यास कोरोना हेल्थ केअर सेंटरला जाऊन तपासणी करावी.