नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशभरातील नोकरदारांना खुश करण्यासाठी मोदी सरकार लवकरच प्राप्तीकराची मर्यादा वाढविणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकार देशभरातील करदात्यांना दिलासा देण्यासाठी महत्वाची घोषणा करू शकते. याच्या अंतर्गत, प्राप्तीकराची मर्यादा ही पाच लाखांपर्यंत वाढविण्यात येईल असे मानले जात आहे. सध्याच्या कर रचनेत २.५० लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त आहे. तित वाढ करून आयकरासाठीची मर्यादा ५ लाख रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, वैद्यकीय आणि परिवहन भत्ता देखील पुन्हा सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत. हे निर्णय देशभरातील नोकरदारांसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. याबाबत अंतरीम अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते.