नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी केले प्रशासनाला सहकार्य ; आर्सेनिक अल्बम-३० औषधी पॅकिंगसाठी केली मदत

 

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावच्या स्वयंसेवकांनी प्रशासनाला कोरोना विरुद्ध लढा देण्याच्या कार्यात सहकार्य केले. प्रशासनाकडून वितरित करण्यात येणार असलेल्या आर्सेनिक अल्बम-३० होमिओपॅथी गोळ्या पॅकिंग करण्यास स्वयंसेवकांनी प्रशासनाला मदत केली.

 

जळगाव जिल्ह्यात कोरोना विरुद्ध लढा देण्याच्या कार्यात केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राचे ३५ स्वयंसेवक जिल्हा समन्वयक नरेंद्र यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून कंटेनमेंट झोन असलेल्या परिसरातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम-३० या होमिओपॅथी औषधींचे वितरण केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत भवनात प्रशासनाकडून औषधी पॅक करण्याचे कार्य सुरू आहे. नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांना देखील या कार्यासाठी उपजिल्हाधिकारी श्री.मत्ते यांच्याकडून बोलाविण्यात आले होते. नेहरू युवा केंद्र जळगावचे समन्वयक नरेंद्र, लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक प्रतिनिधी चेतन वाणी यांच्यासह स्वयंसेवक आकाश धनगर, रोहन अवचारे, संजय बाविस्कर, विशाल शेजवळ, शाहरुख पिंजारी, भुषण लाडवंजारी, फिरोज शेख, चेतन निंबोळकर, कुणाल मोरे, जितेंद्र माळी, ललित चौधरी, चंद्रकांत इंगळे, प्रा.सागर पाटील, जितेंद्र सोनवणे, विक्रांत जाधव यांच्यासह २५ स्वयंसेवकांनी आर्सेनिक अल्बम-३० औषधी पॅकिंग करण्यास प्रशासनाला सहकार्य केले.

Protected Content