नेरी नाका येथील शवदाहिनी मध्ये नॉन कोविड रुग्णांवर देखील अंत्यसंस्कार करता येणार

 

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेरी नाका वैकुंठधाममध्ये केशवस्मृती प्रतिष्ठानने शवदाहिनी बसविली असून गत २ महिन्यात १२५ शवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या शवदाहिनीमध्ये कोरोना व सामान्य निधन झालेल्या व्यक्तींवर देखील अंत्यसंस्कार करण्यात येत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दररोजचे होणारे मृत्यु व अंत्यसंस्कार करण्याकरिता जागेची कमतरता असल्याने महापालिका प्रशासनाने नेरी नाका स्मशानभूमी पूर्णपणे कोरोनाने मृत्यु पावलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यासाठी राखीव ठेवली आहे. परंतू, शवदाहिनीमध्ये कोरोना व सामान्य निधन झालेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार केले जात असल्याची माहिती केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी नेरीनाका वैकुंठधाम मध्ये शवदाहिनी सहाय्यक मयुर सपकाळे ८२६३८ ०५८६६ यांना संपर्क करावा.

Protected Content