जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नेरी दिगर येथील ४० वर्षीय कोरोना संशयित रूग्णांचा आज सकाळी १२ वाजेच्या सुमारास जळगाव येथील कोविड रुग्णालयात मृत्यू झाला आहे. रूग्णाचे स्वॅब धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले असून अद्याप तपासणी अहवाल येणे बाकी आहे.
तालुक्यातील नेरी दिगर येथील ४० वर्षीय तरूणाला श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने २३ एप्रिल रोजी जळगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित रूग्ण म्हणून उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मयत झालेल्या तरूणाचा मृत्यूपुर्वी कोरोना संशयित म्हणून स्वॅब धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले असून अद्याप तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तरूणाचा मृत्यू झाल्याने अहवाल येण्यापुर्वी जामनेर तालुका प्रशासनाने तालुक्यातील नेरी दिगर या गावाला सिल करण्याच्या हालचाली सुरू आहे.