नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सर्व शांत होते. सावध असते आणि समजलं असतं की कोरोना अजून संपला नाही. जगात काय सुरु आहे यावर लक्ष केंद्रीत केलं असतं. ब्राझीलचं उदाहरण समोर होतं. मात्र नेतृत्वाचा अभाव आणि दूरदृष्टी नसल्याने ही स्थिती ओढावली .’ अशी टीका भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एका मुलाखतीत केली
देशात दुसऱ्या लाटेत संपूर्ण आरोग्य यंत्रणेचं पितळ उघडं पडलं आहे. ऑक्सिजनची कमतरता आणि अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. दिवसागणिक रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. दिवसाला ३ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत असून ३ हजार रुग्ण दगावत आहे. भारतात विदारक स्थिती निर्माण झाली. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी या संपूर्ण स्थितीसाठी केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याची अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.
‘मागच्या वर्षी रुग्णांच्या संख्या कमी झाल्याने सर्वांना वाटलं आता वाईट काळ संपला. वाईट परिस्थितीतून बाहेर निघालो आणि अर्थचक्र पुन्हा सुरु केलं. मात्र यामुळे आपलं नुकसान झालं’, असंही त्यांनी पुढे सांगितलं. पहिल्या लाटेनंतर भारतानं लोकसंख्येच्या तुलनेत व्हॅक्सिन तयार केल्या नाहीत. त्यांना वाटलं अजून आपल्याकडे खूप वेळ आहे. आपण कोरोनाला हरवलं आहे. लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरु करु शकतो’, या विचारामुळेच कोरोना वाढल्याचा त्यांनी सांगितलं.
मार्च आणि एप्रिलनंतर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केला काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत..