जळगाव, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने यंदाच्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम वर्ष कला ,वाणिज्य,विज्ञान या शाखेच्या पदवी व पदव्युत्तर या वर्गाच्या मेरिट लिस्ट जाहीर केल्या. यात नूतन मराठा महाविद्यालयातील पदव्युत्तर वर्गाच्या उर्दू विभागातील विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम व तृतीय तर संरक्षण शास्त्र या विभागातील विद्यार्थिनींनी अनुक्रमे द्वितीय क्रमांक पटकावला असून महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
उर्दू विभागातील विद्यापीठातून प्रथम आलेली विद्यार्थिनी सायमा खानम मोहम्मद इरफान खान हिला १६०० पैकी १४४४ मार्क मिळाले असून ‘ओ’ श्रेणी मिळाली आहे.तृतीय आलेली विद्यार्थिनी खान बेनाजीर फतेमा फरीद खान हिला १६०० पैकी १४३३ मार्क असून हिला पण ओ श्रेणी आहे.
संरक्षण आणि सामरिक शास्त्र या विषयात द्वितीय क्रमांकाने पाटील उज्वला सुधाकर हिला ए प्लस श्रेणी मिळाली आहे. नूतन मराठा महाविद्यालयातील प्राचार्य डॉ एल.पी. देशमुख यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.
एन.जे.पाटील, डॉ पी. बी. देशमुख, डॉ.आर बी देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या विद्यार्थ्यांना उर्दू विभाग प्रमुख प्रा.डॉ अफाक शेख, प्रा.डॉ.अनिस शेख तसेच संरक्षण शास्त्र विभागातील प्राध्यापक घनश्याम पाटील, धनंजय रायसिंग व आदींचे मार्गदर्शन लाभले.